मनसेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांची घेतली भेट…!

⚡सावंतवाडी ता.२८-: राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी वृषाली पाटील ,मुकेश साळुंके, यांची आज झाराप बांदा महामार्गावरील प्रश्ना संदर्भात मनसे शिष्ट मंडळाने भेट घेतली त्यावेळी बांदा येथील पुलावरील रस्ताचे पालकमंञ्याच्या हस्ते एक महीना अगोदर उद्घाटन होऊन देखील ब्रिजवरच्या लाईट बंद आहेत. महामार्गाचे बऱ्याच ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे रस्ता खड्डेमय झाला आहे. महामार्गाचे काम संथ गतीने चालु आहे. मळगाव मधील गावात जाणारे साईड रस्त्याचे चे काम अपुर्ण आहे त्या रोडवरून गाडी चालवताना स्थानिक लोकांची ताराबळ होते रस्तावर भरपुर प्रमाणात अपघात पण झाले माहामार्गावरून गावात जाणारे तुमच्या मर्यादित येणारे रस्ते लवकरात लवकर पुर्ण करा महामार्गाला कुठेही सौचालय नाही आणि मार्गावर बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साचुन अपघात झाले आहे या अपघाताला व अपुर्ण कामाना जबाबदार कोण? काम चालु असताना तुम्ही स्वता लक्ष देऊन काम करून घ्या असे सांगीतले या आणि आशा अनेक प्रश्नाचा मारा करूनही अधिकारी पाटील, साळूंखेनी सर्व प्रश्नाना बगल देत आपण पुन्हा रीतसर हायवेची पाहणी करून लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावू असा मनसे शिष्टमंडळाला शब्द दिला.
त्यावेळी उपस्थित मनसे जिल्हाअध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, शहरअध्यक्ष अॅड. राजु कासकर, विभागअध्यक्ष काशिराम गावडे, उपविभागअध्यक्ष राकेश परब, आशितोष राऊळ, मंदार परब उपस्थित होते.
मनसे शिष्टमंडळाने हायवेच्या कामा बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून अपघातास कारणीभूत असणारे धोकादायक रस्ताची कामे लवकरात लवकर पहाणी करून लोकांना रस्ते प्रवासासाठी सुरळीत करून द्यावे नाय तर मनसे तुमच्या विरोधात आंदोलनाचा पवीञा घेणार असे मनसे शिष्टमंडळाने ठणाकावून सांगीतले.

You cannot copy content of this page