मुंबई विद्यापीठामार्फत आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदव्या घेता येणार…

डॉ. शिवाजी सरगर:विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला..

⚡सावंतवाडी ता.२८-: मुंबई विद्यापीठामार्फत आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदव्या घेता येणार आहेत. व्यस्त जीवनशैलीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला असून, त्यात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश आहे.याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सोमवारी (२८ जुलै, २०२५) पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रा. अनिल बनकर, प्रा. दिलीप भारमल, प्रा. मंदार भानुसे, डॉ. लीलाधर बन्सोडे, प्रा. सुभाष वेलिंग आदी उपस्थित होते.
डॉ. सरगर यांनी सांगितले की, “धकाधकीच्या जीवनात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून आणि पदवीपासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या चमूने हा पुढाकार घेतला आहे.” १२वी नंतर आणि पदवीनंतरही हे शिक्षण घेता येणार आहे. एम.कॉम आणि एम.एस.सी. सारख्या तब्बल २८ अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.

You cannot copy content of this page