फलाटावरील गावांचे नाम फलक तात्काळ लावण्यात यावे…

प्रकाश नार्वेकर व रमेश भोसले यांची मागणी:बांदा वाहतूक नियंत्रक कार्यालयात निवेदन सादर..

⚡बांदा ता.२८-: बांदा बस स्थानकावर गावांचे नामफलक नसल्याने गणेश चतुर्थीत गणेश भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्काळ फलाटावरील गावांचे नाम फलक लावण्यात यावेत अशा आशयचे निवेदन बांदा वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर व रमेश भोसले यांना बांदा भाजपच्या वतीने देण्यात आले.

याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत तातडीने वरिष्ठांशी दूरध्वनीवरून याबाबतची कल्पना देऊन येत्या दोन दिवसात गावांचे नामफलक लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, सिद्धेश महाजन, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर, शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर, हेमंत दाभोलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो:-
बांदा वाहतूक नियंत्रक यांना निवेदन देताना बांदा भाजपचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page