जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कणकवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली यांच्यावतीने रविवार ८ मार्च २०२६ रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे महिलांसाठीच्या स्पर्धा, उद्योगिनी पुरस्कार, मान्यवरांचा सन्मान आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर होणार आहेत. मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्यावतीने सलग कार्यक्रमाचे हे यंदाचे २४ वे वर्ष आहे. रविवार ८ मार्च २०२६ रोजी पाककला स्पर्धा दुपारी २ ते या वेळेत होणार असून यामध्ये शाकाहारी अथवा मांसाहारी, कोणत्याहि पद्धतीने केलेला एकच पदार्थ, स्पर्धकाने घरी बनवून आणायचा आहे, आणि पदार्थाची कृती व्यवस्थित रित्या फुल स्केप वर लिहून आणायची आहे. ४ ते ४:३० या वेळेत युट्युब चॅनलच्या माध्यमातून, मनुष्याने आजारांवर मात करत योगसाधनेने निरोगी शरीर कसे ठेवावे यासाठी मार्गदर्शन देणारे सुप्रसिद्ध योगाचार्य आनंद सावंत यांचे स्वानंदी योगसाधना यावर मार्गदर्शन होणार आहे.

चार्मिंग लेडी स्पर्धा यामध्ये फॅन्सी ड्रेस आणि फॅशन शो या माध्यमातून स्पर्धा होणार आहे. इच्छुक महिलांनी, २७ फेब्रुवारी पर्यंत ९८२३४९६१६६ या क्रमांकावर महिला मंचकडे नोंदणी करावयाची आहे. यासोबतच महिलांचे रेकॉर्ड डान्स, नाट्यछटा, एकपात्री अभिनय, गायन, फनी गेम्स, उस्फूर्त सादरीकरण, महिला प्रेक्षक वर्गातील कुपनद्वारे करण्यात येणाऱ्या दोन भाग्यवान महिलांसाठी आकर्षक बक्षीस असा महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा, महिलांनीच महिलांसाठी आयोजित केलेला आणि समोर महिलाच प्रेक्षक वर्ग उपस्थित असणारा जागतिक महिला दिन मिळून साऱ्याजणी महिला मंच कडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आहे. सर्व महिला भगिनींना नम्र विनंती आहे, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page