पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीत उद्या भव्य मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प…

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपचार करून घेण्याचे आवाहन..

कणकवली : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘मल्टी’ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे आरोग्य शिबिर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील तसेच कणकवली तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्थानिक पातळीवर मिळावा आणि महागड्या उपचारांचा आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान यावेळी प्राथमिक तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिरात खालील तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत – १) ह्रदयरोग तज्ज्ञ (Cardiologist)

२) अंतःस्रावी तज्ज्ञ (Endocrinologist

३) स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynaecologist)

४) कर्करोग तज्ज्ञ (Breast, Oral, Cervical Cancer)

५) जनरल सर्जन

६) अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedist

७) मूत्ररोग तज्ज्ञ (Urologist)

तसेच आवश्यक ईसीजी, टू डी इको, सोनोग्राफी, एक्स-रे, ट्युमर मार्कर टेस्ट, एफएनएसी, बायोप्सी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्त्रीरोग समस्या, कर्करोगाची लक्षणे, सांधेदुखी, मूत्रविकार अशा विविध तक्रारी असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी ही संधी दवडू नये आणि उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page