गोव्यातील दोघांना जिल्हा न्यायालयात शिक्षा….

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी होता गुन्हा दाखल..

ओरोस ता २८
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गोवा येथील रामा नवसो परवार (वय – २९) आणि रोहित गुरुदास परवार-कासरपालकर (वय – २२) रा.कासारपाल, ता-बिचोली, गोवा या दोघांना दोषी ठरविले आहे. त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश २ श्रीमती व्ही.एस.देशमुख यांनी एक महिना साधी कैद आणि एक हजार रुपये आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने या प्रकरणी काम पाहिले.
दोडामार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील विश्वास बागल हे २२ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र – गोवा बॉर्डर येथे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत शासकीय कर्तव्य करीत असताना आरोपी रोहित गुरुदास परवार-कासरपालकर यांना तपासणी करिता थांबवले होते. या गोष्टीचा मनात राग धरून काही वेळाने आरोपी रोहित गुरुदास परवार/कासरपालकर याने आरोपी रामा नवसो परवार यांस सोबत घेऊन येवून या दोघांनीही तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील विश्वास बागल यांना धक्काबुक्की केली. तसेच आपले सोबत आणलेल्या वाहनाचे केबलने तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील विश्वास बागल यांना हाताच्या कोपरावर व पाठीवर मारून दुखापत केली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील विश्वास बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश २ श्रीमती व्ही.एस.देशमुख यांच्या न्यायालयात याची सुनावणी आज पूर्ण झाली. न्यायालयाने एकूण सात साक्षीदार तपासले. यात फिर्यादी सुनिल विश्वास बागल, पंच संजय शिरोडकर, पंच अर्जुन भगवान पाटमोरे साक्षीदार पोलीस हवालदार श्री मळगावकर, साक्षीदार निलेश नीलमवार वैद्यकीय अधिकरी ज्ञानेश्वर ऐवळे, तपासिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संभाजी पाटील यांचा समावेश आहे. न्यायालयाने या दोघांनाही दोषी ठरवत भा.द.वि कलम 332, 34 अन्वये एक महिना साधा कारावास व भा.द.वि कलम 353 अन्वये दोषी धरून एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

You cannot copy content of this page