Headlines

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा १२ ऑगस्टला कोकण विभागीय पुरस्काराने होणार गौरव….

⚡वेंगुर्ला ता.२७-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त करणा-या वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत परूळेबाजारचा ‘कोकण विभागीय पुरस्कार‘ १२ ऑगस्ट २०२५ रोजी कोकण विभागाच्या पनवेल येथील कार्यक्रमात वितरण करण्यात येणार आहे.कोकण विभागीय कार्यालयाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परूळेबाजार ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सन…

Read Full News

कणकवली शहरातील आचरा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निविदा प्रसिद्ध…

पावसामुळे काम करणे शक्य नव्हते ; मात्र आता दोन दिवस वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून काम सुरू होणार:नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांची माहिती.. ⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायत हद्दीतील आचरा रोड व इतर ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे नियोजन कणकवली नगरपंचायत मार्फत करण्यात आलेले असून त्या करीत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आचरा रोड हा वर्दळीचा रस्ता…

Read Full News

जर्मनीमध्ये कमी फी मध्ये शैक्षणिक संधी उपल्बध…

सिंधुदुर्गच्या सुपुत्राची ‘एज्युब्रॉड’ संस्था करते सर्वतोपरी मदत:पत्रकार परिषदेत संचालक राहुल नाईक यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२७-: कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी जर्मनीमध्ये अतिशय कमी फीमध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त या ठिकाणच्या पालक आणि मुलांची जर्मनीमध्ये जाण्याची तयारी महत्त्वाची आहे. परदेशात नोकरीच्या अनेक संधी आहेत,…

Read Full News

करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार काम सुरु…

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश:वालावल सरपंच अमृत देसाई यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यातील हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार नाहीत अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केली होती. या मागणीला यश येऊन…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ उत्साहात साजरा…

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात गणित विभागातर्फे ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ (२२ जुलै २०२५) शैक्षणिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘पाय’ संकल्पनेवर आधारित स्वतः तयार केलेल्या लघुचित्रफितींची (रील्स) स्पर्धा आणि अनोखी स्मरणक्षमता स्पर्धा हे या दिवसाचे वैशिट्य ठरले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवे विचार, नव्या दिशा व गणिताची रुची निर्माण करणारा ठरला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…

Read Full News

जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेत कट्टा महाविद्यालयाच्या प्रशांत खडपे याचे यश…

⚡मालवण ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर.आर. सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ते डॉन बॉस्को हायस्कूल सर्कल पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रेड रन स्पर्धेत कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या कुं. प्रशांत लवू खडपे (एफ. वाय. बी. कॉम) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस)…

Read Full News

सांगवे येथील चोरी प्रकरणातील चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे कसून शोध…

⚡कणकवली ता.२७-: तालुक्यातील सांगवे संभाजीनगर येथील श्यामसुंदर विष्णू सावंत यांच्या बंद घरातून चोरट्यांनी २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरी प्रकरणातील संशयित चोरट्यांचा कसून शोध पोलिस घेत आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चोरट्यांचा काही मागोवा लागतो का ? हे बघितले जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक…

Read Full News

बांदा येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.२७-: बांदा येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल, बांदा येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सौ. सुमेधा धुरी यांनी नवे पदाधिकारी जाहीर केले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पल्लवी जोशी व सौ. बाड मॅडम उपस्थित होत्या.नवीन कार्यकारिणीत अध्यक्षा म्हणून प्रियांका हरमलकर, सचिव म्हणून निनता गोवेकर,…

Read Full News

मेढा येथील लिंगेश्वर मंदिरालगतचे पिंपळाचे झाड कोसळले; मंदिराचे नुकसान…

⚡मालवण ता.२७-:मालवण मेढा येथील श्री लिंगेश्वर मंदिराला लागून असलेले जुने पिंपळाचे झाड आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली. हे झाड सुमारे १५० वर्षे जुने होते. हे झाड कोसळल्यामुळे लिंगेश्वर मंदिराची मागील बाजू काही प्रमाणात कोसळून नुकसान झाले आहे, अशी माहिती बाळगोपाळ मित्रमंडळ, मेढा यांनी दिली आहे.

Read Full News

कणकवलीत पोलिसांची नाकाबंदी वाहनचालकांची उडाली तारांबळ…

⚡कणकवली ता.२६-: तालुक्यासह शहरामध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक, अवैद्य होणारी गोवा बनावटीची दारू वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरातील गांगो मंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली होती. यामध्ये पीएसआय राजेंद्र नाणचे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव…

Read Full News

You cannot copy content of this page