कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तीन परीक्षा केंद्र:जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांचा पुढाकार..
⚡कुडाळ ता.२१-: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी युवासेनेकडून दिनांक २९ मार्च २०२५ रोजी अभिरूप सामाईक प्रवेश परीक्षा (mock test) घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही परीक्षा तीन केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यात कुडाळ व मालवणसाठी कुडाळ हायस्कूल, सावंतवाडी व वेंगुर्लासाठी आरपीडी हायस्कूल व दोडामार्गसाठी दोडामार्ग हायस्कूल या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा ही पूर्णपणे मोफत असणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावरून ने आण करण्याची व्यवस्था युवासेनेकडून करण्यात येणार आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. युवासेनेच्या या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थीनी https://yuvasenacet.com/ या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. तसेच कोणतेही अधिक माहिती हवी असल्यास ९४०५८१२१२१ किंवा ९८३४५७९८८२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
