Headlines

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी त्या व्यक्तीचं ग्रामपंचायत इमारतीतील दुकान बंद करा…

शिवसेना महिला आघाडीचा तहसीलदारांना निवेदन; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा..

⚡सावंतवाडी, ता. २१-: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या नावावर ग्रामपंचायत इमारतीमध्ये असलेलं दुकान कायमस्वरूपी सीलबंद करून संबंधित इमारत निर्लेखित करण्यात यावी, अशी मागणी गावातील महिला ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

या मागणीसाठी गावातील महिला ग्रामस्थांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित इमारत व दुकान कायमस्वरूपी सीलबंद करून निर्लेखित करण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांनी दिला.

यावेळी सौ. भाग्यलक्ष्मी गोपाळ मोरजकर यांच्यासह महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page