⚡सावंतवाडी ता.२१-: हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथील बीएसएनएलचा फोर जी टॉवर तात्काळ कार्यान्वित करा या मागणीसाठी वांयगणी सरपंच दत्ताराम दूतोंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण छेडले यावेळी सदरचा टॉवर 15 मे पर्यंत कार्यान्वित करण्याची लेखी ग्वाही अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बीएसएनएल कडून हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथे सहा सात महिन्यापूर्वी फोर जी टॉवर उभारण्यात आला आहे परंतु टॉवर कार्यान्वित नसल्याने तेथील बीएसएनएलचे ग्राहक सेवेपासून वंचित राहिले आहेत वेळोवेळी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधूनही टॉवर कार्यान्वित करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने अखेर ग्रामस्थांनी सरपंच दत्ताराम दूतोंडकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग बाळू देसाई मायकल डिसोजा अशोक धुरी विनोद ठाकूर शिंदे गट तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला दरम्यान सदरचा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी लागणारी मायक्रोव्हे कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अन्य कनेक्टिव्हिटी साठी प्रपोजल वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठवण्यात आले आहे यासाठी कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे सदरची कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याने 15 मे पर्यंत टॉवर कार्यान्वित करण्याची लेखी ग्वाही यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांनी काहीशी माघार घेत हे उपोषण स्थगित केले. यासाठी उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
या उपोषणामध्ये उपसरपंच रवींद्र धोंड,भाजपा सरचिटणीस श्री प्रशांत प्रभुखानोलकर,माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गावडे
ग्रामपंचायत सदस्य अनंत मठकर,ग्रामपंचायत सदस्य अनंत केळजी तसेच ग्रामस्थ प्रताप करंगुटकर, सुनील प्रभुखानोलकर,विलास मांजरेकर ,प्रकाश नागोळकर, सचिन वाडेकर,सत्यवान दुतोंडकर,शशिकांत असोलकर,श्रीकृष्ण हळदनकर,रवींद्र शिरोडकर, साहिल सावंत,निलेश म्हापणकर, जयेश आकेरकर, समीर केळूसकर आदींनी सहभाग दर्शवला होता.
बीएसएनएल टाॅवर सुरु करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने वायंगणी ग्रामस्थांचे उपोषण मागे…
