प्रभाकर सावंत: वेंगुर्लात नैसर्गिक शेती संमेलन उत्साहात संपन्न..
⚡वेंगुर्ला ता.३०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षात अनेक समाजाभिमुख योजना राबविल्या असून त्या योग्यप्रकारे यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या बारा वर्षात देशाचा सर्वच क्षेत्रात कायापालट झाला आहे. दरम्यान रासायनिक शेतीचे परिणाम पाहता व पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय आणला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कृषी – पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. पुढील पाच -दहा वर्षात शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांस व कृषी क्षेत्रास पुन:श्च चांगले दिवस
येतील, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज मंगळवारी वेंगुर्ला येथे आयोजित प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलनात केले.
भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने
मंगळवार दि. ३० जून रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्ती निमित्त
प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
किसान मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी,
किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत,
किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे,
फळबाग तज्ञ डॉ. रणजीत देव्हारे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. सागर मोरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम,
तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, जि. प. सदस्य विजय नाईक, आत्मा कमिटी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला खरेदी विक्री संघ संचालक वसंत तांडेल, नगरसेवक नगरसेविका, वेंगुर्ला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस प्रमुख बाळकृष्ण गावडे,नागपूर येथील जैविक शेतकरी चंद्रशेखर पारखी तसेच तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, सरपंच, भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरवली येथील प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांना शेतकरी फेलो पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल व प्रसन्ना देसाई यांनी आभार मानले.
