Headlines

श्रावणी सोमवारनिमित्त माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंची पाटेकर देवस्थानला भेट…

सावंतवाडी : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी पहिल्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीच आराध्य दैवत श्री पाटेकर देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी पाटेकर देवाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आशीर्वाद घेतले.

पाटेकर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर माजी सरन्यायाधीशांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन घेतल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी देवस्थानच्या परिसराची व ऐतिहासिक महत्त्वाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहून सरन्यायाधीशांचे स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान विधी क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर आणि वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये मुंबई – गोवा बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲड.संग्राम देसाई, ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. शामराव सावंत, ॲड. संदीप निंबाळकर यांच्यासह इतर अनेक वकिलांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने झालेल्या या विशेष भेटीमुळे पाटेकर देवस्थान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page