Headlines

आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’…

MKCL कडून मोफत AI मास्टरक्लासची घोषणा:रौप्यमहोत्सवी वर्षात MS-CIT ला प्रतिष्ठित ‘SKOCH Award’..

कुडाळ : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या वतीने डिजिटल साक्षरतेचा प्रसार करणाऱ्या ‘MS-CIT’ या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award (Digital Literacy श्रेणीत) जाहीर झाला आहे. गेल्या २५ वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशनातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल हा बहुमान मिळाला आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून MKCL ने राज्यात ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही ६० दिवसांची व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत नागरिकांसाठी मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी माहिती एमकेसीएलचे कोऑर्डिनेटर प्रणय तेली यांनी दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
येथील हॉटेल स्पाईस कोकण मध्ये प्रणय तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र गावडे, कु. अत्मास करोल उपस्थित होते. यावेळी प्रणय तेली यांनी सांगितले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त असलेला हा मास्टरक्लास www.mscit.ai या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. तसेच बदलत्या काळाची गरज ओळखून MS-CIT कोर्समध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डेटा साक्षरता आणि क्लाउड कंप्यूटिंगचा समावेश करण्यात आला आहे. यात विद्यार्थी ChatGPT, Gemini, Copilot आणि Canva सारख्या १२५ हून अधिक AI टूल्सचा प्रत्यक्ष वापर शिकतील.
श्री. तेली पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी AI आधारित पर्सनलाइज्ड चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टायपिंग कौशल्यासाठी Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे, ज्याची परीक्षा MSBTE द्वारे घेतली जाईल. रोजगारक्षमता वाढवण्यासाठी टॅली (with GST), ॲडव्हान्स्ड एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग यांसारखे २६५ हून अधिक कोर्सेस उपलब्ध असून, काही कोर्सेससाठी YCMOU ची मान्यताप्राप्त गुणपत्रिका आणि ‘KLIC डिप्लोमा’ मिळवण्याची संधी आहे.
​महाराष्ट्रातील ५,००० हून अधिक अधिकृत MKCL शिक्षण केंद्रांवर या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांनी जवळच्या केंद्राशी संपर्क साधून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन MKCL तर्फे प्रणय तेली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page