कणकवली ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक…

कणकवली – ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कणकवलीची मासिक बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली विरंगुळ केंद्र कणकवली येथे झाली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष सीताराम कुडतरकर, सचिव प्रमोद लिमये, सल्लागार मनोहर पालयेकर, शंकर कुंटे, अर्जुन राणे, श्रद्धा तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शंकर कुंटे म्हणाले, आदर्श जीवनशैली म्हणजे पैसा मिळवणे हे नाही. प्रत्येकाने आंनदी व समाधानी जीवन जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायला शिकले पाहिजे. सुख उपभोगताना त्यात आनंद शोधावा. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शंकर कुंटे यांचा भालचंद्र मराठे व सन्मान करण्यात आला.

यावेळी दादा कुडतडकर, अर्जुन राणे, श्रद्धा तांबे, मनोहर पालयेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शंकर कुंटे यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाला ५००० रुपयांची आर्थिक मदत केली. याबद्दल संघाने त्यांचे आभार मानले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रमोद लिमये यांनी केले.

You cannot copy content of this page