Headlines

इन्सुली रमाईनगर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

भीमगर्जना युवक मंडळाच्या वतीने सामुदायिक बुद्धवंदना; मान्यवरांनी केले अभिवादन..

⚡बांदा ता.२१-: इन्सुली येथील रमाईनगरमध्ये भीमगर्जना युवक मंडळाच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामुदायिक बुद्धवंदना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या विचारमंचावर भीमगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव, सल्लागार सदानंद जाधव, दीपक जाधव, ह्युमन राईट्स कोकण विभागीय उपाध्यक्ष आनंद जाधव आणि धम्मचारी लोकदर्शी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेणबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी धम्मचारी लोकदर्शी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, धर्मांतरामुळे समाजात घडलेले परिवर्तन आणि बौद्ध धम्माच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने कोणते प्रयत्न करायला हवेत, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी दिलेल्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा अंगीकार करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
आनंद जाधव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव केला. यावेळी सानिका, स्मृतिषा आणि सुप्रिया यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी लोकदर्शी यांनी केले, तर आभार मंडळाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी मानले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राघोबा जाधव, कृष्णा जाधव, अशोक जाधव, राहुल जाधव, योगेश जाधव, नितेश जाधव, मिथिल जाधव, तन्मय जाधव, अमृत जाधव, दीपेश जाधव, तेजस जाधव, संजना जाधव, सविता जाधव, दीपाली जाधव, स्मिता जाधव, अनुजा जाधव, अनघा जाधव, भावना जाधव, सोनाली जाधव, नलिनी जाधव, शरयू जाधव, काजल जाधव, मयुरी जाधव, सृष्टी जाधव, प्रद्युम जाधव, यज्ञश जाधव आदी उपस्थित होते.
फोटो:-
इन्सुली येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कसर्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर व बांधव.

You cannot copy content of this page