Headlines

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत मुलांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख सन्मानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना व अंगणवाडीतील मुलांना शालेय वस्तू देण्यात आल्या तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार साहेब सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा माजी…

Read Full News

निलेश राणे यांनी मला व वैभव नाईक यांना राजकीय संन्यास घेण्याचा फुकट सल्ला देऊ नये…

परशुराम उपरकर:रवींद्र चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत निलेश राणेंचा विजय सुकर केला.. ⚡कणकवली ता.२६-: भाजपमध्ये असताना आमदार निलेश राणे यांचा पक्षांतर्गत छळ झाल्यानंतर त्यांनी द्विट करीत राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. पण, त्यानंतर ते हिमालयात गेलेले दिसले नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभा…

Read Full News

माजी आमदार म्हटल्यानंतर आम्हाला कुठल्याही एरियाची मर्यादा नाही…

परशुराम उपरकर:मुंबईतील एक दलाल येऊन गेला त्यामुळेच ही प्रेस घ्यायला भाग पाडलं.. ⚡सावंतवाडी ता.२६-: माजी आमदार म्हटल्यानंतर आम्हाला कुठल्याही एरियाची मर्यादा नाही महाराष्ट्रात आम्ही कुठेही आणि कोणत्याही विषयावर लक्ष घालू शकतो, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लक्ष घातला याबाबत कोण पदाधिकारी वृत्तपत्रातून नाराजी व्यक्त करतात हे चुकीचे आहे, मुंबईतील एक दलाल येऊन गेला त्यामुळेच ही प्रेस…

Read Full News

स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे शिवसेना महावितरण कार्यालयावर धडक देणार…

निशांत तोरसकर; वेळ पडल्यास जनतेसाठी प्रसंगी कोर्टात देखील जाणार… ⚡सावंतवाडी ता.२६-: स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जबरदस्ती हे स्मार्ट मीटर बसवले जात असून, अशाप्रकारे जबरदस्तीने एम एस सी बी स्मार्ट मीटर बसू शकत नाही त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे शहर…

Read Full News

वेतन थकल्याने मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी छेडले काम बंद आंदोलन…

⚡मालवण ता.२६-: मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला…

Read Full News

वाढत्या चोरीच्या घटणांच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात अचानक पोलिसांची नाकाबंदी…

⚡बांदा ता.२६-: वाढत्या चोरीच्या घटणांच्या पार्श्वभूमीवर आज बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करत शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली.गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. बांदा शहरात देखील अलीकडच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सराफ व्यवसायिकांच्या झालेल्या बैठकीत पोलिसांनी…

Read Full News

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२६-:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात महिलांसह पुरुषांनीही तपासणी करून घेतली, मात्र महिलांची संख्या विशेष लक्षणीय ठरली. एकूण ३२२ नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला.कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेवर निदान व्हावे व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य जागृती वाढावी या उद्देशाने तालुका आरोग्य अधिकारी…

Read Full News

मिलाग्रीस प्रशाळेत पालक दिन उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२६-: मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शुक्रवार, दिनांक 25 जुलै रोजी पालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.’पेरेंट्स -अवर होप अँड जॉय ‘ या थीम नुसार या कार्यक्रमात पालकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धोंडी कारीवडेकर व सौ. शुभांगी कारीवडेकर उपस्थित होत्या. ईशस्तवन व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी…

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विकास सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण…

⚡सावंतवाडी ता.२६-: आज सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माझी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष स्वर्गीय विकास भाई सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी दिलीप नार्वेकर यांनी विकास सावंत यांच्या रूपाने एक अभ्यासू, शिक्षण,सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व सावंतवाडीने गमावले असे गौरव उद्गार काढले व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास भाई सावंत हे…

Read Full News

जिल्ह्यात शिक्षकांची ३५० हून अधिक पदे रिक्त…

काका कुडाळकर:रिक्त पदे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची ३५० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती आणि एकूणच जिल्हा परिषदेचा सुरू असलेला कासवगती कारभार पाहता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त…

Read Full News

You cannot copy content of this page