⚡बांदा ता.२६-: वाढत्या चोरीच्या घटणांच्या पार्श्वभूमीवर आज बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करत शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली.
गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. बांदा शहरात देखील अलीकडच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सराफ व्यवसायिकांच्या झालेल्या बैठकीत पोलिसांनी शहरातील गस्त वाढविण्याच्या सूचना व्यापाऱ्यांनी दिल्या होत्या. बांदा हे महत्वाचे शहर असून याठिकाणी परप्रांतीय व्यापारी तसेच अनोळखी व्यक्तींचा वावर हा मोठ्या प्रमाणात असतो.
निरीक्षक पालवे यांच्यासह वाहतूक पोलीस शेखर मुणगेकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी बांदेश्वर मंदिर रस्त्यावर सकाळी अचानक नाकाबंदी केली. यावेळी गोव्यातून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
फोटो:-
बांदा शहरात पोलिसांनी अचानक नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली.
वाढत्या चोरीच्या घटणांच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात अचानक पोलिसांची नाकाबंदी…
