बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२६-:
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात महिलांसह पुरुषांनीही तपासणी करून घेतली, मात्र महिलांची संख्या विशेष लक्षणीय ठरली. एकूण ३२२ नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेवर निदान व्हावे व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य जागृती वाढावी या उद्देशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. करतस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. त्यांच्यासमवेत तालुका आरोग्य सहाय्यक शंकर परब, तालुका आरोग्य सेवक अरुण गवस, कार्यक्रम सहाय्यक विशाल डोंगळी, पीसीएम विनिता दळवी, नीतिका सावंत आणि सांख्यिकी सहाय्यक ज्योती ठुंबरे यांनी तालुका पातळीवर समन्वय साधला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, डॉ. जना आव्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोणापाल, डॉ. सोनाली पाटील, डॉ. अमित भाग्यवंत, डॉ. आरती देसाई, डॉ. दिपाली वराडकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रियांका पाटील कासार, दंत चिकित्सक डॉ. मण्यार यांची उपस्थिती लाभली.
शिबिराच्या व्यवस्थापनात आरोग्य सहाय्यक बी. टी. जाधव, आरोग्य निरीक्षक पी. आर. साळगुडे, आरोग्य सहायिका एस. एस. रणशूर, औषध निर्माण अधिकारी आर. म्हाडगुत, कनिष्ठ सहाय्यक दिनेश देसाई, आरोग्य सेवक नरेंद्र बांदवलकर, दिग्विजय जाधव, राजू नाईक, सुरेश कांबळे, सीएचओ तेजस्विनी माजगावकर, सीएचओ अमोल खिल्लारी, वैभव शेजुळ, महेश हिपलकर यांनी विशेष काम पाहिले.
तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुहास शेळपाडकर, वर्षा बांदेकर, परिचारिका प्रेमा कदम, परिचारिका रश्मी शेणयी, दीपा देसाई, शरयू सावंत, स्टाफ नर्स अर्चना गोंसाल्विस, आरोग्य सेविका शांती कदम, गटप्रवर्तक भक्ती मेस्त्री, सफाईगार वासुदेव जाधव, तसेच सर्व आशा, हिंदलॅब कर्मचारी, प्रा. आरोग्य केंद्र सांगली मुळेवाड व हिरवडे आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लाभले.
रोटरी क्लब ऑफ बांदा कडून उपाध्यक्ष दिगंबर गायतोंडे, सचिव सुधन केसरकर, आबा धारगळकर, यशवंत आळवे, बाबा काणेकर, विराज परब, योगेश परुळेकर, रत्नाकर आगलावे, सुनील राऊळ व संजय शिरोडकर या पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वयंसेविका म्हणून रितिका माजगावकर, वनिता धुरी, सावली कामत, संजना सावंत, रत्नमाला वीर यांनी तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मदत व मार्गदर्शन केले.या मोफत तपासणी शिबिरात स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग अशा तपासण्या करण्यात आल्या. काही संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
तपासणी नंतर उपस्थित महिलांना व पुरुषांना कर्करोग प्रतिबंधक उपाय, लक्षणे व योग्य काळजी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित डॉक्टर व रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी नियमित तपासणी करून घ्यावी, योग्य वेळी उपचार घ्यावेत आणि आरोग्य सजगतेत कायम पुढे राहावे, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page