स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे शिवसेना महावितरण कार्यालयावर धडक देणार…

निशांत तोरसकर; वेळ पडल्यास जनतेसाठी प्रसंगी कोर्टात देखील जाणार…

⚡सावंतवाडी ता.२६-: स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जबरदस्ती हे स्मार्ट मीटर बसवले जात असून, अशाप्रकारे जबरदस्तीने एम एस सी बी स्मार्ट मीटर बसू शकत नाही त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आज येथे दिली. दरम्यान यावेळी ग्राहकांनी, सामाजिक संघटनांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी तोरसकर यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले मीटर बसवताना कोणालाही विश्वासात घेतले जात नाही. घरी कोणी नसताना हे मीटर बसवले जात आहेत, मात्र याचा परिणाम लोकांना अद्याप माहित नाही. याचे भविष्यातील परिणाम आम्ही लोकांना पटवून सांगून या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत भविष्यात आम्ही कोर्टात देखील जाऊ असा इशारा देखील तोरसकर यांनी यावेळी दिला आहे. तसेच कुठल्याही अधिकारी जर तुम्हाला जबरदस्ती करत असेल तर ग्राहकांनी आम्हाला येऊन भेटावं आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. दरम्यान शहरातील लाईट दिवसातून दहा वेळा जाते त्यासाठी आधी सक्षम उपयोजना करा त्यानंतर स्मार्ट मीटर बसवण्याचा धाडस करा असंही तोरसकर यावेळी म्हणाले

यावेळी शहर संघटक शैलेश गावंढळकर, शब्बीर मणियार, समीरा ख्वाजा, आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page