Headlines

कणकवलीत पोलिसांची नाकाबंदी वाहनचालकांची उडाली तारांबळ…

⚡कणकवली ता.२६-: तालुक्यासह शहरामध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक, अवैद्य होणारी गोवा बनावटीची दारू वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरातील गांगो मंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली होती. यामध्ये पीएसआय राजेंद्र नाणचे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव…

Read Full News

दत्ता सामंत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश घेण्याचे प्रकार थांबवावेत…

अन्यथा जशास तसे उत्तर देऊ ; बाबा मोंडकर यांचा इशारा.. ⚡मालवण ता.२६-: महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे भाजप मधील पदावर असलेल्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत आहेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे प्रकार सुरू असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. ही युतीच्या समन्वयासाठी…

Read Full News

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार…

रुपेश राऊळ: ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन… ⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यांमध्ये उद्या दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथे काजी शहाबुद्दीन हॉल (बस स्थानकासमोर) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांचा सत्कार आयोजित केला…

Read Full News

बांदा-बोरिवली विशेष गाडी सुरू…

गुरु कल्याणकर यांच्या मागणीला यश:चाकरमान्यांनी गाडीचा लाभ घेऊन तात्काळ ऑनलाईन आरक्षण करावे.. ⚡बांदा ता.२६-: गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने बांदा-बोरिवली ही विशेष गाडी सुरू केली असून या गाडीचे ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. बांदा दशक्रोशीतील जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या गाडीचा लाभ घ्यायचा असून तात्काळ ऑनलाईन आरक्षण करावे असे आवाहन भाजपचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर…

Read Full News

शिवछत्रपतींच्या किल्ल्याचा वारसा जपतानाच इतिहास जाणून घ्या…

इतिहासकार सुधीर थोरात यांचे शिवप्रेमींना आवाहन:कुडाळ मध्ये रंगला शिव अभिमान सोहळा,युनेस्को वारसा स्थळ शिवकिल्ल्याच्या समावेशाचे औचित्य.. कुडाळ : मराठ्याची ओळख असणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व खांदेरी या किल्ल्याचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गातील अनेक संस्था अथक…

Read Full News

मेजर संजय सावंत यांचा वेंगुर्ला रोटरीतर्फे सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२६-: कारिवडे (सावंतवाडी) येथील सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनी ऑपरेशन सिधूर, ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटएअर स्ट्राईक, टेरर अटॅक अशा आर्मीमधील वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये सहभाग घेऊन नेतृत्व करताना प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला होता. त्यांच्या देशसेवेची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने अध्यक्ष आनंद बोवलेकर व रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांच्या हस्ते त्यांचा…

Read Full News

भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल कार्यकारिणी जाहीर…

⚡कणकवली ता.२६-: भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी शनिवारी कणकवली शहर मंडल कार्यकारिणी जाहीर केली. येथील खासदार नारायण राणे संपर्क कार्यालयात श्री. साटम व कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी नव्या कार्यकारिणीची माहिती दिली. सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. यातील नव्या व जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर पक्षाच्या अनेक सेल्स असून पदापासून…

Read Full News

बांदा येथे नवजात बालक व माता यांच्यासाठी रोटरॅक्ट क्लब तर्फे उपयुक्त किटचे वाटप…

⚡बांदा ता.२६-: रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा यांनी ‘अध्याय जननी’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून नुकतीच प्रसूती झालेल्या माता व त्यांच्या नवजात बाळांसाठी उपयुक्त किटचे वाटप केले. नव्या आयुष्याची सुरुवात गोड व्हावी, आईला आधार मिळावा आणि बाळाला पहिल्या दिवसांपासून योग्य काळजी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या किटमध्ये आई आणि बाळाला सुरुवातीच्या काळात गरजेच्या वस्तू समाविष्ट करण्यात…

Read Full News

गव्या रेड्यांचा न्हावेलीत पुन्हा धुमाकूळ ; काजू कलमांची केली नासधूस…

⚡सावंतवाडी ता.२६-: न्हावेली गावात गव्या रेड्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून न्हावेली येथील बागायतदार शेतकरी श्री.शशिकांत रघुनाथ परब यांच्या बागेतील काजू कलमांची नासधूस करुन मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.दरम्यान गव्या रेड्यांनी काजू कलमांचे नुकसान केल्याची बातमी कळताचं न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वनविभागाशी संपर्क केला असता वनविभागाची टिम तात्काळ न्हावेली गावात दाखल होऊन नुकसानाची…

Read Full News

येणाऱ्या पाच वर्षात अशा खेळाडूंना आवश्यक व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न राहील…

पालकमंत्री नितेश राणे:जागतिक जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूर्वा गावडे हिच्या नागरी सत्कार… ⚡ओरोस ता २६-: जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी क्रीडा क्षेत्रात मोठे होवू पाहत आहेत. परंतू त्यांना आवश्यक सुविधा अस्तित्वात नाहीत, यांची खंत वाटते. मात्र, येणाऱ्या पाच वर्षात अशा खेळाडूंना आवश्यक व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यातून जिल्ह्याच्या गावागावात पूर्वा गावडे तयार होतील, असा…

Read Full News

You cannot copy content of this page