रुपेश राऊळ: ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन…
⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यांमध्ये उद्या दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथे काजी शहाबुद्दीन हॉल (बस स्थानकासमोर) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे.
तरी सावंतवाडी तालुक्यातील माजी जि.प. सदस्य, माजी पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपतालुका संघटक, विभाग प्रमुख, विभागीय संघटक, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख महिला आघाडी व युवा सेना सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहावे रुपेश राऊळ, यांचे आवाहन.