गुरु कल्याणकर यांच्या मागणीला यश:चाकरमान्यांनी गाडीचा लाभ घेऊन तात्काळ ऑनलाईन आरक्षण करावे..
⚡बांदा ता.२६-: गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने बांदा-बोरिवली ही विशेष गाडी सुरू केली असून या गाडीचे ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. बांदा दशक्रोशीतील जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या गाडीचा लाभ घ्यायचा असून तात्काळ ऑनलाईन आरक्षण करावे असे आवाहन भाजपचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर यांनी केले आहे.
गणेशोत्सव कालावधीत मुंबईहून बांद्यात येणारी एकही एसटी बस नसल्याने गुरु कल्याणकर यांनी एसटी महामंडळाला निवेदन देत बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने बांदा बोरिवली ही बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसचे आगाऊ बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. बांदा शहर व दशक्रोशीतील मुंबईस्थित चाकरमान्यांनी लवकरात लवकर या बसचे ऑनलाईन पद्धतीने आगाऊ तिकीट बुकिंग करावे.
या बसचे ऑनलाईन आरक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ याच मार्गावर दुसरी एसटी बस सुरू करणार असल्याचे एसटी महामंडळाने आश्वासन दिले असल्याची माहिती श्री कल्याणकर यांनी दिली आहे. ही दुसरी बस ठाणे येथून बांदा येथे सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.