बांदा येथे नवजात बालक व माता यांच्यासाठी रोटरॅक्ट क्लब तर्फे उपयुक्त किटचे वाटप…

⚡बांदा ता.२६-: रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा यांनी ‘अध्याय जननी’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून नुकतीच प्रसूती झालेल्या माता व त्यांच्या नवजात बाळांसाठी उपयुक्त किटचे वाटप केले. नव्या आयुष्याची सुरुवात गोड व्हावी, आईला आधार मिळावा आणि बाळाला पहिल्या दिवसांपासून योग्य काळजी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या किटमध्ये आई आणि बाळाला सुरुवातीच्या काळात गरजेच्या वस्तू समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बाळाच्या आहाराबाबत योग्य माहिती, काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन देण्यात आले. यासोबतच मातांनी बाळासाठी आणि स्वतःसाठी कोणती काळजी घ्यावी, स्वच्छता कशी राखावी, पोषक आहाराचे महत्व काय आहे, याची माहिती देणारे माहितीपत्रकही देण्यात आले.
या उपक्रमात माजी अध्यक्ष अवधूत चिंदरकर, क्लबचे सचिव मिताली सावंत, संकेत वेंगुर्लेकर, ओमकार पावस्कर, तसेच रोटरी व रोटरॅक्ट सदस्य विराज परब, बाबा काणेकर व दत्तराज चिंदरकर उपस्थित होते.
‘अध्याय जननी’ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू मातांना आणि बाळांना मायेची शिदोरी देण्याचा क्लबचा हा प्रयत्न अनेकांसाठी आश्वासक ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे आई-बाळाच्या नात्यातील नाजूक बंध अधिक मजबूत होतात आणि समाजात आरोग्याची जाणीव अधिक ठळक होते.

You cannot copy content of this page