देव्या सूर्याजी: तर मच्छी विक्रेत्यांना पाण्याची सोय करून देण्याची ही केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२४-: आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून नगरपरिषदेला दिलेली रूग्णवाहिका कुठे आहे ? कोणत्या संस्थेकडे ती दिली आहे ? तीच पुढे काय झालंय याची माहिती मिळावी अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सभागृहात केली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी मच्छी मार्केट येथील विहीर ही नगरपरिषदेची नसून खाजगी मालकीची असल्याचे सांगत संबंधितांकडून मार्केटला पाणी वापरण्यास मज्जाव केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. याला नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दुजोरा देत मच्छी विक्रेत्यांना पाण्याची सोय करून देण्यात यावी तसेच मंजूर झालेली बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी द्यावी अशी सुचना केली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील संबंधित विहीर खाजगी मालकीची नसून ती नगरपरिषदेच्या मालकीची आहे असे सांगत सभापती श्री. बांदेकर यांना समर्थन केले. तर तातडीन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुचनाही त्यांनी केली.
