सावंतवाडीत जीर्ण धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करा…

नगरसेविका अ‍ॅड. नीता सावंत कविटकर यांची मागणी: तर प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, ॲड निरवडेकर यांच आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींमुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका अ‍ॅड. नीता सावंत कविटकर यांनी केली. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ अंतर्गत कलम ३३१ अन्वये संबंधित इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांच्याकडे सभागृहात केली.

त्या म्हणाल्या, शहरात अनेक ठिकाणी जुन्या व जीर्ण अवस्थेतील इमारती उभ्या असून त्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेषतः गर्दीच्या भागात अशा इमारती असल्याने दुर्घटनेचा धोका अधिक वाढला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करावी तसेच संबंधित मालकांना नोटिसा बजावून कायदेशीर कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page