⚡वेंगुर्ला ता.२६-: कारिवडे (सावंतवाडी) येथील सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनी ऑपरेशन सिधूर, ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटएअर स्ट्राईक, टेरर अटॅक अशा आर्मीमधील वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये सहभाग घेऊन नेतृत्व करताना प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला होता. त्यांच्या देशसेवेची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने अध्यक्ष आनंद बोवलेकर व रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संजय सावंत यांनी आपल्या मिलिटरीमधील ३३ वर्षांचा अनुभव सांगितला. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
मेजर संजय सावंत यांचा वेंगुर्ला रोटरीतर्फे सन्मान…
