कणकवलीत पोलिसांची नाकाबंदी वाहनचालकांची उडाली तारांबळ…

⚡कणकवली ता.२६-: तालुक्यासह शहरामध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक, अवैद्य होणारी गोवा बनावटीची दारू वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरातील गांगो मंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली होती.

यामध्ये पीएसआय राजेंद्र नाणचे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव , उपस्थित होते.

यावेळी चारचाकी व अवजड वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र या नाकाबंदीमध्ये काही वाहन परवाने नसलेले वाहनचालकांची तारांबळ उडाली होती.

You cannot copy content of this page