⚡मालवण ता.२७-:
मालवण मेढा येथील श्री लिंगेश्वर मंदिराला लागून असलेले जुने पिंपळाचे झाड आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली. हे झाड सुमारे १५० वर्षे जुने होते. हे झाड कोसळल्यामुळे लिंगेश्वर मंदिराची मागील बाजू काही प्रमाणात कोसळून नुकसान झाले आहे, अशी माहिती बाळगोपाळ मित्रमंडळ, मेढा यांनी दिली आहे.
मेढा येथील लिंगेश्वर मंदिरालगतचे पिंपळाचे झाड कोसळले; मंदिराचे नुकसान…
