देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा – विलास साळसकर…

देवगड (प्रतिनिधी)

देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील चालू असलेली ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा अशी मागणी शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
देवगड तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास थर्ड पार्टी क्वालीटी मॉनीटरींग रिपोर्ट दि. २८ एप्रिल २०२२ योजनेंतर्गत जामसंडे येथे जो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे त्या प्रकल्पाला केंद्रीय एस. के. खंडेलवाल समीतीने अहवालात नमूद केल्याप्रमाणे ९५ लाख दंड भरुन घेण्यात आला आहे का ? असे
असतानाच कोणत्याही प्रकारचा बदल न करता प्रकल्पांचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. ते
तात्काळ बंद करण्यात यावे. मागील ठेकेदाराने केलेले काम डीमालीश करुन सूचविलेला दंड वसूल करून मागील ठेकेदार यांना काळया यादित टाकून नवीन निवीदा सादर करुन सूचविलेला दंड वसूल करून काम करावे. असे असताना काम चालू केले आहे ते तात्काळ बंद करावे.

     कोर्ले सातार्डी धरणावरुन देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात

येणार आहे. त्यात ३१ डिसेंबर २०२४ मासीक सभेच्या अजेंड्या प्रमाणे ठराव क्र. १३ नगरसेवकांना देण्यात आलेला इतिवृत्तांत व माहीतीच्या अधिकारात मागवीण्यात आलेला इतिवृत्तांत यात ठराव क्र. १३ सूचक
अनुमोदकसहीत ठराव बदलण्यात आला असून याबाबत आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये ? नगरपंचायत अधीनियमाप्रमाणे एकदा घेतलेला ठराव ९० दिवसांच्या आत बदलता येत नाही तरीही आपण
३१ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेला ठराव पुनःश्च ३० जानेवारी २०२५ च्या मासीक सभेत घेण्यात
आला आहे. याबाबतही सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील
शहरवासीयांना पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यात इतर सात गावातील पोंभुर्ले गावकरीता
२६ लाख ११ हजार ८०० बुरंबावडे, ९७ लाख ७६ हजार १००, उंडील १ कोटी ८७ लाख ८ हजार ९००,विठलादेवी ७८ लाख ७३ हजार २००, वाघीवरे ७९ लाख ८१ हजार ९०० फणसगाव ९७ लाख ६ हजार ३००,कुणकवण ५१ लाख ६१ हजार ६०० जलजीवन मिशन अंतर्गत निधी मंजूर असून ७० ते ८० टक्के कामे पूर्ण झालेली असून देवगड जामसंडे शहरवासीयांना राबविण्यात येणाऱ्या नळयोजनेवर त्या गावांना परवानगी देण्याचा ठराव घेण्याचा अट्टाहास कशासाठी ? तो ठराव तात्काळ रदद करण्यात यावा. तसेच पी एम सी बदल करण्याचा जो अट्टाहास आहे या प्रोसेसमध्ये प्रकल्पास विलंब होवून शहरवासीयांना राबवीण्यात येणारी योजना विलंबाने कार्यरत होण्याची शक्यता जाणवते. असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page