Headlines

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे”कांदळवन संवर्धन आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.२८-:आंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्य साधून विभागिय वनाधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे“कांदळवन संवर्धन आणि जनजागृती विषयक” कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमात दीपक जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात कांदळवन बद्दल माहिती…

Read Full News

आचरा पिरावाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला…!

⚡मालवण ता.२८-:कालपासून बेपत्ता असलेल्या आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल (वय ४२) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूच्या विहिरीत सापडून आला. याबाबत आचरा पोलीस स्थानकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल हे काल रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. नातेवाईक, मित्रमंडळी…

Read Full News

मनसेकडून उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या ‘बाटल्यांचा हार’…

मनसेने अवैध दारु विक्रेत्यांची यादीच दिली एक्साईजकडे:सात दिवसात धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन.. ⚡कुडाळ ता.२८-: तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतूकी विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत परब यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून उपरोधिक…

Read Full News

कुडाळ स्थानकाची रेल्वे अधिकाऱ्यांकडून पाहणी…

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा:फलाटाला लागून असलेल्या धोकादायक दरडीकडे वेधले लक्ष.. कुडाळ : कोकण रेलवेचे कुडाळ रेल्वे स्थानक बाहेरून चकचकीत दिसत असले तरी रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक कुडाळ रेल्वे स्थानकाची पाहणी करायला आले असता, कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिकांनी कुडाळ रेल्वे…

Read Full News

मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना समजवावे…

भाजपा जिल्हाध्यक्षांचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देत चुकीच्या कार्यपद्धतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत.हे तात्काळ थांबावे या साठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे साकडे…

Read Full News

गोव्यातील दोघांना जिल्हा न्यायालयात शिक्षा….

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी होता गुन्हा दाखल.. ओरोस ता २८शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गोवा येथील रामा नवसो परवार (वय – २९) आणि रोहित गुरुदास परवार-कासरपालकर (वय – २२) रा.कासारपाल, ता-बिचोली, गोवा या दोघांना दोषी ठरविले आहे. त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश २ श्रीमती व्ही.एस.देशमुख यांनी एक महिना साधी कैद आणि एक हजार…

Read Full News

फलाटावरील गावांचे नाम फलक तात्काळ लावण्यात यावे…

प्रकाश नार्वेकर व रमेश भोसले यांची मागणी:बांदा वाहतूक नियंत्रक कार्यालयात निवेदन सादर.. ⚡बांदा ता.२८-: बांदा बस स्थानकावर गावांचे नामफलक नसल्याने गणेश चतुर्थीत गणेश भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्काळ फलाटावरील गावांचे नाम फलक लावण्यात यावेत अशा आशयचे निवेदन बांदा वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर व रमेश भोसले यांना बांदा भाजपच्या वतीने देण्यात आले. फोटो:-बांदा वाहतूक नियंत्रक…

Read Full News

मुंबई विद्यापीठामार्फत आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदव्या घेता येणार…

डॉ. शिवाजी सरगर:विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला.. ⚡सावंतवाडी ता.२८-: मुंबई विद्यापीठामार्फत आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदव्या घेता येणार आहेत. व्यस्त जीवनशैलीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला असून, त्यात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश आहे.याबाबतची माहिती मुंबई…

Read Full News

मनसेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांची घेतली भेट…!

⚡सावंतवाडी ता.२८-: राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी वृषाली पाटील ,मुकेश साळुंके, यांची आज झाराप बांदा महामार्गावरील प्रश्ना संदर्भात मनसे शिष्ट मंडळाने भेट घेतली त्यावेळी बांदा येथील पुलावरील रस्ताचे पालकमंञ्याच्या हस्ते एक महीना अगोदर उद्घाटन होऊन देखील ब्रिजवरच्या लाईट बंद आहेत. महामार्गाचे बऱ्याच ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे रस्ता खड्डेमय झाला आहे. महामार्गाचे काम संथ गतीने चालु आहे. मळगाव…

Read Full News

वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही…

महाविकास आघाडीसह घटक पक्ष आक्रमक: अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब.. ⚡सावंतवाडी ता.२८-: वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही ग्राहकांच्या परवानगीशिवाय कुठलेही मीटर बसवता कामा नये,तसेच बसवण्यात आलेले मीटर तात्काळ काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आज येते महाविकास आघाडीचे घटक पक्षातील पदाधिकारी व ग्राहकांनी वीज कंपनीचे अधिकारी शैलेश राक्षे यांच्याकडे…

Read Full News

You cannot copy content of this page