Headlines

भाजपची बांदा मंडल कार्यकारणी जाहीर…

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आज, ३१ जुलै रोजी भाजप संघटना पर्व २०२५ अंतर्गत बांदा मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला १०० टक्के यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे आवश्यक असल्याने या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी बांदा मंडळाची कार्यकारिणी जाहीर करताना…

Read Full News

सावंतवाडी भाजप शहर मंडल कार्यकारिणी जाहीर…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचे ध्येयसावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व २०२५’ अंतर्गत सावंतवाडी येथे आज (गुरुवारी) भाजप कार्यालयात सावंतवाडी शहर मंडल कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला शतप्रतिशत यश मिळवून देण्यासाठी आणि स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी भाजपचे जिल्हा…

Read Full News

तिलारी धरण परिसराला पर्यटनाचे लागणार आंतरराष्ट्रीय कोंदण…

खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वेधले लक्ष :स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश करण्याची केली मागणी.. ⚡सिंधुदुर्ग दि.३१-: मुंबईसह कोकण भागातील काही समस्यांवर, विकासकामांबाबत खासदार नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार राणे यांनी मांडलेल्या विषयांना पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या…

Read Full News

भाजप आंबोली मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी,ता.३१-: भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व 2025’ अंतर्गत आज सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आंबोली मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी संघटनात्मक बळकटी आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस श्री….

Read Full News

सावंतवाडी शहराच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष…

राजू कासकर यांचा आरोप:शहरात मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसली.. ⚡सावंतवाडी ता.३१-: एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या सावंतवाडी शहराकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, आरोग्य आणि नागरी समस्यांकडे हेतुपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप मनसे शहर अध्यक्ष राजू कासकर यांनी केला आहे. शहरात मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसली असून, अनेक महत्त्वाचे प्रकल्प धूळ खात…

Read Full News

इन्सुली खामदेव नाका येथे ट्रकने धडक दिल्याने युवती गंभीर जखमी…!

⚡बांदा ता.३०-: मुंबई गोवा महामार्गांवर इन्सुली खामदेव नाका येथे ट्रकने धडक दिल्याने युवती ट्रकखाली येऊन गंभीर जखमी झाली. तिला स्थानिकांनी बाहेर काढत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय 26, रा. बांदा पानवळ) असे जखमीचे नाव आहे. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी चालकाला जाब विचारात वाहतूक रोखून धरली.

Read Full News

युवा- युवतीसेनेतर्फे उद्या मालवणात महाविद्यालयीन युवतींसाठी आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.३०-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा- युवतीसेनेच्या कार्यकारिणी सदस्य रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे करण्यात आले आहे. महाविद्यालयीन युवतीनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक युवतीसेना सिंधुदुर्ग…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू…

गेले अनेक दिवस होती लिफ्ट बंद ; रुग्णांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणेंचे आभार.. कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेली लिफ्ट मागील कित्येक दिवस बंद होती. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याकडे याबाबत तक्रार देखील झाली होती. मात्र कोणत्याही तक्रारीला बाजूला न करता त्यावर मार्ग काढला पाहिजे या विचाराने जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे…

Read Full News

दांडी येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली…

नागरिकांमधून समाधान ; सन्मेष परब यांनी मानले भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार… मालवण, ता. २९ : दांडी येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत होते. त्यामुळे या भागात असलेल्या ६० केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वाढ होण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही झाली आहे.अनेक वर्षे नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे दूर…

Read Full News

आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ‘पीएमश्री’ शाळा सन्मान चराठा नं. १ चा प्रभाकर सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार…

शाळेचे व शाळेतील शिक्षक,मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांचे केले कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाचपई आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ चराठा ‘ पीएमश्री ‘ शाळा म्हणून समर्पित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शाळेला हा बहुमान मिळाल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी…

Read Full News

You cannot copy content of this page