सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आज, ३१ जुलै रोजी भाजप संघटना पर्व २०२५ अंतर्गत बांदा मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला १०० टक्के यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे आवश्यक असल्याने या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी बांदा मंडळाची कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी आंबोली मंडळ अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मंडळ सरचिटणीस मधुकर देसाई, नारायण कांबळी, उमेश पेडणेकर, जितेंद्र गावकर आणि सावंतवाडी विधानसभेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी खालीलप्रमाणे:
अध्यक्षपदी स्वागत रघुवीर नाटेकर,
तर उपाध्यक्षपदी रूपेश (सचिन) राजेंद्र बिर्जे, गुरुदत्त सुरेश कल्याणकर, उल्हास उत्तम परब, ओंकार दिगंबर प्रभू आजगावकर, सौ. गीता श्याम कासार (महिला), सौ. राजन कळंगुटकर (महिला) तर
सरचिटणीस म्हणून मधुकर मोहन देसाई, नारायण शंकर कांबळी
तसेच चिटणीसपदी राजाराम उर्फ बाळू सावळाराम सावंत, अष्टविनायक सुधाकर धाऊसकर, योगेश अशोक केणी, विनेश कृष्णा गवस, सायली सहदेव साळगावकर (महिला), उर्मिला उदय बांदेकर (महिला) यांची तर
कोषाध्यक्षपदी संजना संजय रंगसुर (महिला) यांची निवड करण्यात आली.
तसेच मंडळ कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेश सुरेश चव्हाण, सिद्धेश सगुण कांबळी, प्रवीण बाबाजी देसाई, रिचर्ड अँथनी डिमेलो, संदीप गोपाळ नेमळेकर, सचिन मोहन देसाई, शिवा विजय गावकर, संजय भिवसेन सावंत, नितीन श्रीधर सावंत, संदीप पुंडलिक बांदेकर, जगन्नाथ एकनाथ धुरी, आत्माराम रामा गावडे, ज्ञानदीप वासुदेव राऊळ, दीपक देऊ नाईक, रूपेश प्रभाकर धर्णे, संजय वासुदेव दळवी, सहदेव महादेव कोरगावकर, प्रशांत मधुकर कामत, रोहित देवीदास नाडकर्णी, धनंजय तुकाराम गवस, यशवंत आत्माराम आचरेकर, शैलेश ज्ञानदेव केसरकर, सचिन सदाशिव दळवी, रामचंद्र श्रीकृष्ण झाटये, अर्जुन श्रीधर शेर्लेकर, संतोष विठ्ठल नाईक, संदेश लक्ष्मण महाले, चिंतामणी नाईक, रूपाली सुधीर शिरसाट, तातो चंद्रकांत शेटये, जागृती जितेंद्र गावकर (महिला), माधुरी मनोहर पेटेकर (महिला), शिल्पा उमेश म्हापसेकर (महिला), शर्मिला राजेश मांजरेकर (महिला), गौरी दिगंबर पावसकर (महिला), सारिका विश्राम सातार्डेकर (महिला), मिलन विनायक पार्सेकर (महिला), भावना नाईक (महिला), सुचिता राजेंद्र शिंदे (महिला), हर्षदा गंगाराम पेडणेकर (महिला), ऋतुजा आत्माराम देसाई (महिला), प्रतिमा उत्तम गवस (महिला), स्मिता रामचंद्र पेडणेकर (महिला), उन्नती जगन्नाथ धुरी (महिला), वेदिका विलास नाईक (महिला) या नियुक्त्या तात्काळ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
बांदा मंडळाचे अध्यक्ष स्वागत रघुवीर नाटेकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ही नवीन कार्यकारिणी आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मजबूत करेल आणि यश मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपची बांदा मंडल कार्यकारणी जाहीर…
