स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचे ध्येय
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व २०२५’ अंतर्गत सावंतवाडी येथे आज (गुरुवारी) भाजप कार्यालयात सावंतवाडी शहर मंडल कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला शतप्रतिशत यश मिळवून देण्यासाठी आणि स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, सावंतवाडी शहर मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर, ॲड. संजू शिरोडकर, आनंद नेवगी, उदय नाईक, महिला अध्यक्ष सौ. मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्यासह सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: सुधीर सुरेश आडिवरेकर
उपाध्यक्ष: उदय बाबाजी नाईक, अलताफ अब्दुल मुल्ला, वैशाख प्रकाश मिशाळ, गोपाळ शशिकांत नाईक, मेघना मंगेश साळगांवकर (महिला), सुकन्या प्रवीण टोपले (महिला)
सरचिटणीस: दिलीप चंद्रकांत भालेकर, चंद्रकांत दत्ताराम शिरोडकर
चिटणीस: किरण शांताराम रंकाळे, धीरेंद्र राजेंद्र म्हापसेकर, मंदार मोहन पिळणकर, प्रकाशिनी प्रकाश मेस्त्री (महिला), नयना विशाल सावंत (महिला), मेघा नरेश भोगटे (महिला)
कोषाध्यक्ष: साईकिरण महादेव परब
याव्यतिरिक्त, मंडल कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश रामचंद्र वाडकर, मयूर बाळू लाखे, हितेन प्रशांत नाईक, अॅलेक्स आयरन रॉड्रिक्स, विश्वास गुरुनाथ टोपले, अरुण सीताराम पडवळ, प्रसाद अनिल जोशी, ज्योती विजय मुद्राळे (महिला), अक्षय अनिल तानावडे, मिलिंद नारायण तानावडे, संपदा सुनील जाधव (महिला), विपुल रामचंद्र कंटक, गौतम संतोष कलंगुटकर, दीक्षा राजेश पडते (महिला), हेमांग मनोहर माणगावकर, मीना संतोष दाभोलकर (महिला), योगेंद्र शंभू पावसकर, विपुल प्रशांत वराडकर, अश्वेक जितेंद्र सावंत, महेश ज्ञानेश्वर बांदेकर, सुदेश सुनील नेवगी, अनिकेत विजय सुकी, चिन्मय प्रवीण वंजारी, प्रज्ञा प्रसाद वागळे (महिला), तेजस विशाल चव्हाण, स्नेहा विनोद कास्टे (महिला), अनिश मंदार पांगम, विजय विलास सावंत, वैष्णवी विद्यानंद बांदेकर (महिला), अनुष्का सुशीलकुमार केरकर (महिला), स्वप्नील श्रीकांत कमते, अभिनंदन सुरेश राणे, भार्गव रघुनाथ धारणकर, प्रथमेश प्रकाश पेडणेकर, सुमिधा सुनील मडगांवकर (महिला), सरिता अभिजीत भंडारे (महिला), सुनील विष्णू जाधव, प्रथमेश विजय टोपले, समिधा रविंद्र नाईक (महिला), पल्लवी कुंदन टोपले (महिला), संतोष प्रल्हाद मठकर, अन्वीशा अनंत मेस्त्री (महिला), तृप्ती संदीप विर्नोडकर (महिला), भावना अरविंद नार्वेकर (महिला), प्रसाद उमेश नाईक, प्रतीक दिलीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून सावंतवाडीत भाजप अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास नवनियुक्त शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. ही कार्यकारिणी पक्षाची ध्येये पूर्ण करण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडी भाजप शहर मंडल कार्यकारिणी जाहीर…
