⚡बांदा ता.0१-: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने नुकतीच ‘गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य’ या विषयावर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बांदा नट वाचनालयचे सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू यांनी उत्कृष्ट निबंध लेखन करत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या लेखनशैलीसह विषयाचे सखोल मांडणीमुळे परीक्षकांनी त्यांच्या निबंधाची विशेष दखल घेतली. या यशाबद्दल श्री नातू यांचे बांदा परिसरातून तसेच साहित्य व वाचनालय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
फोटो:-
कोल्हापूर येथे सुनील नातू यांना पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.
‘गुरू तेग बहादूर’ निबंध स्पर्धेत सुनील नातू यांना तृतीय क्रमांक…
