Headlines

पळसंब येथे १ जुलै रोजी मालवण तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळावा

⚡मालवण ता.२७-:
हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती मालवण व कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पळसंब येथे सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मालवणच्या सभापती प्रज्ञा भाऊ चव्हाण, उद्घाटक उपसभापती घनश्याम चंद्रकांत झाड तर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष वसंत साटविलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सुमेधा संतोष पाताडे, सोनाली सुनील घाडीगावकर, वर्षा मांगिरीश सांबारी, क्षमा संदीप हडकर, अक्षता राजन गावडे तसेच पंचायत समिती सदस्य सीमा सतीश परुळेकर, मानसी प्रमोद भोगावकर, योजना जयराम कांबळी, माधुरी मोहन मसुरकर, रिया रोहित बांवकर, संजय शिवाजी ठाकूर, दिपक केशव चव्हाण, दिपक भागोजी सुर्वे, संतोष दत्तात्रय गावडे, गणेश लक्ष्मण तोंडबळकर उपस्थित राहणार आहेत.

या कृषि मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मृदा व जलसंधारण तसेच कृषि विषयक मार्गदर्शन मिळणार आहे. परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांनी या कृषिदिन व कृषि मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलेतकर, तालुका कृषि अधिकारी अर्जुन जाधव आणि गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page