Headlines

डी. एड कॉलेज मालवण येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

मालवण वार्ताहर –

मालवण येथील डी.एड कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सागर रेडकर, यतीका जाधव, दिशा चव्हाण, चैताली शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.

या प्रसंगी डीएड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी प्रा. नागेश कदम, प्रा. सौ.पूर्वा शिरसाट प्रा. रमेश वळवी, प्रा. आनंदी घोगळे प्रा. संजय केळूसकर, बार्टीचे समतादूत संग्राम कासले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बनसोडे यांनी केले तर आभार सिद्धी राणे यांनी मानले.

You cannot copy content of this page