नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खासदार चषक’ क्रिकेट स्पर्धा…

८ ते १२ एप्रिल दरम्यान बांद्यात रंगणार सामने..

⚡बांदा ता.०१-: खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खासदार नारायण राणे चषक’ ही क्रिकेट स्पर्धा दिनांक ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत बांदा येथील पाटेश्वर मैदानावर खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये १ लाख, तर द्वितीय पारितोषिक रुपये ५० हजार ठेवण्यात आले आहे. याशिवाय बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर तसेच इतर उत्तेजनार्थ बक्षिसांसह खासदार चषक प्रदान करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा ‘एक गाव – एक संघ’ या संकल्पनेवर आधारित असून प्रत्येक संघात दोन आयकॉन खेळाडूंचा समावेश असणार आहे. माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, सुनील धामापूरकर, साईनाथ धारगळकर, राजा सावंत, निलेश नाटेकर, संदीप बांदेकर, आपा धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, प्रवीण नाटेकर, बंटी गवंडळकर, बाबा गाड, ऋषी हरमलकर, गौरव नाटेकर, अर्णव स्वार, साई सावंत मोर्ये, सिद्ध मोर्ये, विकी कदम, स्वप्निल सावंत, बिठू परब, प्रथमेश मोर्ये, सोहेल जमादार, सोहेल खान, रितेश धामापूरकर, शिवनाथ मळेवाडकर, रूपेश बांदेकर, गुरु बिले, प्रसाद नाईक, विलास पावसकर आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
दरम्यान, या स्पर्धेसाठी पक्षाचे विविध वरिष्ठ नेते उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
फोटो:-
बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जावेद खतीब, बाळु सावंत व इतर.

You cannot copy content of this page