मळेवाड, शिरोडा व रेडीतील लहान व्यावसायिकांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप; सेवाभावातून सामाजिक बांधिलकीचा संदेश..
⚡वेंगुर्ला ता. २७-:
“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर परिसरातील लहान व्यापाऱ्यांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाळ्यात रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात व्यवसाय सुरू ठेवताना छोट्या व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी छत्री ही केवळ वस्तू नसून त्यांच्या व्यवसायाला आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला आधार देणारे संरक्षण कवच ठरते, ही भावना ठेवून विशाल परब यांनी हा उपक्रम राबविला. या मदतीमुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक समोर नसताना केवळ सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देत केलेल्या या मदतीचे नागरिक व व्यापारी वर्गातून कौतुक करण्यात आले.
“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी असते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत व्यापाऱ्यांना मदतीची छत्री मिळाल्याने सेवाभावाचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.
यावेळी मळेवाड येथे महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्यासह सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनील निरवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, जिल्हा परिषद सदस्या सौ. अपर्णा सातोसकर, ओंकार प्रभू, माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, विकास परब, केतन आजगांवकर, गिरीश परब, बंड्या दळवी, बंटी जामदार, विजू साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
रेडी येथे सरपंच श्री. रामसिंग उर्फ भाई राणे, उपसरपंच आनंद भिसे, ग्रामपंचायत सदस्य नमिता नागोलकर, रश्मी रेडकर, सागर रेडकर, सामाजिक कार्यकर्ते सागर राणे, दीपक राणे, दिलीप राणे, दर्शन कांबळी, संजय कांबळी, विनायक कांबळी आदी उपस्थित होते.
शिरोडा बाजारपेठ येथे माजी सरपंच मनोज उगवेकर, लक्ष्मीकांत कर्पे, श्रीकांत राजाध्यक्ष, शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, संतोष धानजी, चंद्रशेखर गोडकर, अशोक परब, बाबल गावडे, प्राजेश गावडे, दादा शेटये, बाळकृष्ण परब, दत्ताराम फटजी, विद्याधर धानजी, तुषार म्हाकले, दीपक नाटेकर आदींसह व्यापारी, भाजप पदाधिकारी, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
