निसरड्या रस्त्यामुळे गाडीला अपघात..
⚡सावंतवाडी ता.२७-: मळेवाड प्राथमिक शाळे जवळील वळणावर आज दुपारी ३ च्या सुमारास दोडामार्ग वरून शिरोड्याच्या दिशेने एक चारचाकी पीकअप जात असताना वळणावर गाडी स्लीप होऊन अपघात घडला.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील तिन्हीही प्रवासी सुखरूप बाहेर पडले.यात गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,मळेवाड प्राथमिक शाळेच्या जवळील वळणावर गाडी आली असताना पावसामुळे निसरडा बनलेल्या रस्तावर अचानक गाडी स्लीप होऊन गाडी गटारात जाऊन कलंडली. अपघात घडताच मोठ्या आवाजाने येथील ग्रामस्थांनी तेथे धाव घेत आतील माणसांना बाहेर काढले आणि तत्काळ बाजूच्या मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.डॉ. मसके यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले.
यात दीपक नाईक(४६)शिरोडा, ऋषिकेश कासकर (३१) आरवली यांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीमधील सर्वजण सुखरूप आहेत.
