⚡मालवण ता.३१-:
मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी प्रवासी टर्मिनल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, सोन्या-चांदीची भरघोस बक्षिसे, इरकली पैठण्या व इतर गृहोपयोगी भेटवस्तू देण्यात येणार असून उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ होणार आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ३०० स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी मालवणी निवेदक बादल चौधरी व निवेदक अक्षय सातार्डेकर निवेदन करणार आहेत. झी मराठी ‘गाव गाता गजाली’ फेम आर्टिस्ट यांचे ‘१० फुटी महाबली हनुमान’ हे या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. अधिक माहतीसाठी शिल्पा खोत ९४२२५८४६४१, तन्वी भगत, सायली कांबळी, निकिता तोडणकर, मानसी सरजोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.