भाजप आंबोली मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी,ता.३१-: भारतीय जनता पार्टीच्या ‘संघटन पर्व 2025’ अंतर्गत आज सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आंबोली मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी संघटनात्मक बळकटी आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग, माजी आंबोली मंडळ अध्यक्ष श्री. रवींद्र मडगांवकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. संदीप गावडे, आंबोली मंडळ अध्यक्ष श्री. संतोष राऊळ, बांदा मंडळ अध्यक्ष श्री. स्वागत नाटेकर, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष श्री. सुधीर आडीवरेकर, तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या नियुक्त्यांमुळे आंबोली मंडळात भाजपची संघटनात्मक पकड आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अधिक यश मिळवून देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्षपदी रामचंद्र गावडे, किरण सावंत, दिनेश सारंग, अशोक माळकर, प्रियंका गावडे,सुनन्या कासकर, सरचिटणीस पदी संजय शिरसाट,केशव परब, चिटणीस पदी सुरेश शिर्के, सिद्धेश तेंडोलकर, सागर ढोकरे सावित्री पालेकर, पल्लवी राऊळ, स्नेहल कासले, कार्याध्यक्षपदी पंकज पेडणेकर, तर मंडल कार्यकारणी सदस्य पदी वासुदेव जाधव, संदीप पाटील, प्राजक्ता केळुसकर, निलेश पास्ते, गजानन सावंत, अब्दुल साठी, निकिता राऊळ, सदाशिव नार्वेकर, सुरेश शेट्टी, चंद्रोजी सावंत,मनस्वी सावंत, देवयानी पवार, प्रमोद सावंत, शिवाजी परब, सानिया सावंत, राजेंद्र परब,गौरव मुळीक, नीलकंठ बुगडे, प्रकाश दळवी, आरती माळकर, साधना शिटी, दत्ताराम कोळमेकर, पंढरीनाथ राऊळ, नारायण परब, नम्रता गावडे, कृष्णा सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, प्रशांत देसाई, हनुमंत पेडणेकर, सुनील परब, मीनल जंगम, दर्शन राऊळ, मृणाली राणे, विनायक दळवी भगवान सावंत आत्माराम धोंड वर्षावर दत्ताराम गावडे सुवर्णलता गावडे, रुचिरा परब आदींची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page