गेले अनेक दिवस होती लिफ्ट बंद ; रुग्णांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणेंचे आभार..
कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेली लिफ्ट मागील कित्येक दिवस बंद होती. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याकडे याबाबत तक्रार देखील झाली होती. मात्र कोणत्याही तक्रारीला बाजूला न करता त्यावर मार्ग काढला पाहिजे या विचाराने जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून त्वरित निधी उपलब्ध करून दिला.
मागील अनेक दिवस उपजिल्हा रुग्णालयाची लिफ्ट तांत्रिक कारणाने बंद होती. दरम्यान यावेळी ऍडमिट केलेले रुग्ण जिन्याने चालत तसेच कक्षसेवक व नातेवाईकाना धरून शिफ्ट केले जायचे. यामध्ये रुग्ण व नातेवाईकांची तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गैरसोय होत होती. मात्र पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्यापर्यंत सदरची माहिती पोहोचली आणि पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी तात्काळ लिफ्ट दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल रुग्ण व नातेवाईकांमधून पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.