युवा- युवतीसेनेतर्फे उद्या मालवणात महाविद्यालयीन युवतींसाठी आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.३०-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा- युवतीसेनेच्या कार्यकारिणी सदस्य रुचि राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे करण्यात आले आहे. महाविद्यालयीन युवतीनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक विद्या सरमळकर, युवतीसेना जिल्हाध्यक्ष निनाक्षी शिंदे- मेतर, तालुकाध्यक्ष भाग्यश्री लाकडे- खान, युवासेना मालवण तालुका समन्व्यक मंदार ओरोसकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर व युवा-युवतीसेना पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page