‘हिंदू वैश्य’ नोंदीला ओबीसी मान्यता
वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा:जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.१२-: वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा इतर मागास प्रवर्गात स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केल्याने…
