वेरली येथे महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ…

वेरलीतून महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार..

⚡मालवण ता.०१-:
मसुरे जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सौ क्षमा संदीप हडकर तसेच महायुतीचे मसुरे पंचायत समितीचे उमेदवार संजय उर्फ छोटू शिवाजी ठाकूर यांच्या वेरली येथील प्रचाराचा शुभारंभ श्रीदेवी सातेरी मंदिरात करण्यात आला.

यावेळी वेरली गावातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा एकमुखी निर्णय उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला. यावेळी संजय उर्फ छोटू ठाकूर, वेरली सरपंच धनंजय परब, संदीप हडकर, विभाग प्रमुख संतोष पालव, भाजपा ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, दिगंबर परब, पराग खोत, दत्ताराम परब, अशोक परब, लक्ष्मण परब, भाग्येश परब, ओमकार दुखंडे, नागराज नावेलकर, चंद्रसेन बागवे, यश शिरसाट, ओमकार लाड, सोहम सावंत, रुपेश दुखंडे, रोशन कासले, शरद लाड, मधु वंजारे, प्रसाद खोत, अशोक सांडव, पांडुरंग ठाकूर, राजेंद्र ठाकूर, गुरुदास ठाकूर, ओमकार ठाकूर, संकेत ठाकूर, प्रशांत परब, अनंत भोगले, व महायुतीचे वेरली येथील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभानंतर वेरली गावात प्रचार फेरीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page