⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी हर्षिता सहदेव राऊळ हिने उत्कृष्ट कथाकथन सादर करत तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत स्वामी विवेकानंद यांच्या कथांवर आधारित कथाकथन तिने प्रभावीपणे सादर केले. तिच्या या यशाबद्दल तिला प्रशस्तीपत्र, ग्रंथभेट तसेच रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी हर्षिताला वर्गशिक्षिका प्रज्ञा मातोंडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक मारुती फाले, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, आनंदी मोर्ये व नेहा गोसावी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय…
