कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेवलेला एक व्हॉट्सॲप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. श्री. नलावडे यांनी आपल्या स्टेटसमध्ये तीव्र शब्दांत अप्रत्यक्ष प्रतिक्रिया व्यक्त केली असून,
“आमच्याच मारेकऱ्याच आज पक्षप्रवेश, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार… अजब तुझे…!”
असा आशय त्यांनी मांडला आहे. या स्टेटसमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावरून समीर नलावडेंचा व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत…
