मुंबई माहीम चे आमदार महेश सावंत संजय गावडे यांच्या प्रचारात सक्रिय…

⚡वेंगुर्ला ता.०१-: उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघातून ठाकरे शिवसेना पक्षातर्फे संजय दत्ताराम गावडे हे रिंगणात आहेत. आज आसोली नारायण मंदिर येथे
माहीम मुंबई चे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संजय गावडे यांच्या आसोली येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चमणकर, मानकरी, तसेच विकी केरकर, वेंगुर्ला शहरप्रमुख शैलेश परुळेकर, तुळसकर, नाईक, मदन गावडे,भूषण धुरी, आत्मा खाडी, रुपेश जाधव, आनंद गावडे,रवी गावडे,बंटी तांडेल, सुजित चमणकर सुधीर डीचोलकर, शशांक तुळसकर, भाऊ आरोलकर
आदी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उर्वरित मतदारसंघात प्रचारासाठी आमदार उपस्थित राहणार असून त्यामुळे ठाकरे शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले आहे, असे यावेळी बोलताना निलेश चमणकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page