⚡सावंतवाडी ता.०१-: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,(ट्रस्ट) अक्कलकोट येथून प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता आरोंदा गावात आगमन होणार असून,कस्टम ऑफिस खासकीलवाडा येथे आगमन व स्वागत होणार आहे.
सवाद्यसहित भव्य दिव्य अशी मिरवणूक श्री देवी सातेरी भद्रकाली देऊळवाडा मार्गे श्री देव कुळकार देवस्थान मंदिर (इनामतबाग) पिरवाडी आरोंदा येथे येऊन स्थानापन्न होणार आहे.
नाशिक महिला यांचे ढोल पथक असून राजन आरोंदेकर यांनी पुरस्कृत केले आहे.
कार्यक्रम रूपरेषा:-गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी दुपारी१२ वाजता सामुहिक नामस्मरण,आरती ,तीर्थप्रसाद. सायंकाळी ७:०० वाजता श्री नारायण देव महिला भजन मंडळ, हरमल गोवा यांचा भजनाचा कार्यक्रम (सुहास प्रभू,पुरस्कृत) रात्रौ ८:०० आरती,पुष्पांजली त्यानंतर महाप्रसाद (भंडारा)रात्रौ ९:३० वाजता भजनाचा कार्यक्रम,आरोंदा संयुक्त भजन मंडळ.शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ४:३० काकड आरती ,श्री देवी माऊली वारकरी भजनी मंडळ केरवाडा ,सकाळी ५:३० वाजता सामुदाहिक दुग्धाभिषेकतरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आरोंदा यांनी केले आहे.
