माजी सभापती घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यामुळे दत्ता सामंत यांनी शिरवंडे दिपमाळवाडी ग्रामस्थांना स्वखर्चाने बांधून दिला नवा साकव…!

⚡मालवण ता.२२-:शिरवंडे दिपमाळवाडी येथील जुना साकव जीर्ण होऊन कोसळल्यामुळे ग्रामस्थांची झालेली गैरसोय लक्षात घेवून मालवणचे आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी नवीन साकव मंजूर केला असून नवा साकव पुर्ण होईपर्यंत आता पावसाळ्यात येथील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून याठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण…

Read More

जिल्ह्यातील ५०० डाटा ऑपरेटर ७ महिने वेतनापासून वंचित…

गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याची मनसेची जि. प. सीईओंकडे मागणी:सोमवारपर्यंत वेतन जमा करण्याचे सीईओंचे आश्वासन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर गेल्या सहा महिन्यांपासून वेतना विना आहेत. त्यांचे वेतन गणेशोत्सवा पुर्वी वितरित करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांकडून येत्या सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा…

Read More

मनसेच्या आंदोलनानंतर एक्साईज कडून धाडसत्र…

आतापर्यंत ५.६८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त ; २४ जणांवर गुन्हे:जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली माहिती.. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच केलेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख,अडसष्ठ हजार ,तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध…

Read More

पाट हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा…

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या मुलांकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या. यामधून कुमार निरज परब याने प्रथम क्रमांक मिळवला तर इतर मुलांच्या ही सुंदर कलाकृती कलादालनात ठेवण्यात आल्या. निसर्गाप्रती ओढ निर्माण व्हावी याकरिता इको क्लबची स्थापना…

Read More

युवा महोत्सवात सिंधुदुर्गचा नेहमीच १०० टक्के सहभाग…

डॉ. निलेश सावे:एसआरएम कॉलेजमध्ये ५८ वा युवा महोत्सव,विविध ४२ स्पर्धा प्रकारात ३५० विद्यार्थी सहभागी.. कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ सांस्कृतिक विभागांपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग हा शंभर टक्के असतो. जिल्ह्यातील सर्व ४२ महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. असे गेली चार वर्षे होत असून कुठल्याही विभागाच्या प्रतिसाद असा एवढा मोठा नसतो. अशा शब्दात मुंबई विद्यापीठाच्या…

Read More

रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रूपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या…

⚡​सावंतवाडी,ता.२२-:सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.​गेल्या काही दिवसांपासून, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जाण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. या गैरसोयीची दखल घेत…

Read More

धान्य दुकानदार सौ लक्ष्मी परब यांचा उत्कृष्ट सेवा बद्दल सन्मान…!

⚡सावंतवाडी ता.२२-: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न धान्याचे उत्कृष्ट व पारदर्शक वितरण केल्याबद्दल जिल्हा महसूल विभागाच्या वतीने सौ लक्ष्मी राघो परब यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.सन १९८५ पासून गेल्या चार दशकांपासून परब दांपत्याच्या प्रामाणिक व तत्पर सेवेची दखल घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.सौ लक्ष्मी राघो परब या रेशन दुकानच्या परवानाधारक असून त्यांचे…

Read More

जुगार अड्डयावरील ती माणसे अवघ्या दोन तासांत सुटलीच कशी…?

वैभव नाईक: पकडण्यात आलेली माणसं ही सर्व राणेंचीच असल्याचा केला आरोप.. ⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी काल धाड टाकली. पोलिसांना त्याठिकाणी बोलावून घेत सदर आरोपींवर कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपींना कसे काय सोडण्यात आले? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. तर…

Read More

भाजप जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचा पत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले त्यांच्या या झालेल्या नियुक्ती बद्दल अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Read More

रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडीत शालेय मुलांना वह्या वाटप…!

⚡सावंतवाडी ता.२२-: भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने कै. सुधाताई कामत जि प शाळा नं. 2, कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि.प शाळा नं.6 भटवाडी सावंतवाडी, वि. स. खांडेकर विद्यालय भटवाडी सावंतवाडी जि प शाळा नं. 4 खासकीलवाडा सावंतवाडी शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला….

Read More
You cannot copy content of this page